Devendra Fadnavis: ... कोणाचे संबंध होते? देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटील प्रकरणी केला मोठा खुलासा

Devendra Fadnavis: … कोणाचे संबंध होते? देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटील प्रकरणी केला मोठा खुलासा

| Updated on: Oct 20, 2023 | 2:42 PM

VIDEO | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटील प्रकरणी बोलताना तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर सडकून टीका केली आणि ललित पाटील याची चौकशी का झाली नाही? कोणाचा दवाब होता, त्यावेळचे मुख्यमंत्री जबाबदार होते की गृहमंत्री? असा सवालही केला

मुंबई, २० ऑक्टोबर २०२३ | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटील प्रकरणी बोलताना तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर जोरदार निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, ललित पाटील याला डिसेंबर २०२० ला अटक करण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ललित पाटीलला नाशिक शिवसेना प्रमुख केले होते. ललित पाटील याला अटक झाल्यानंतर पीसीआर मागितला आणि गुन्हा मोठा असल्याने ललित पाटीलला १४ दिवसाचा पीसीआर मिळाला. पीसीआर मिळताच ते ससूनला अॅडमिट होते. दरम्यान, सरकारी पक्षातर्फे कोर्टाला अर्ज केला नाही की यांच इंट्रोगेशन केलं नाही. त्यामुळे शेवटी त्यांचा एनसीआर करून टाकला, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी त्यांनी थेट सवालही उपस्थित केले की, ललित पाटील याची चौकशी का करण्यात आली नाही? कोणाचा दवाब होता, त्यावेळचे मुख्यमंत्री जबाबदार होते की गृहमंत्री? कोणाचे संबंध होते ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, आता तुम्हीच ठरवा कोणाची नार्को टेस्ट झाली पाहिजे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनाच केलाय.

Published on: Oct 20, 2023 02:42 PM