अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले...

अजित दादांवरच्या ‘त्या’ आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

| Updated on: May 13, 2024 | 9:08 AM

राजकीय महत्वकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही पण त्यामागचा हेतू काय हे सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे असते, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा तर अजित पवार यांच्यावर झालेल्या आरोपांवर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. बघा नेमकं काय म्हणाले?

अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलंय. २०१३ पासून जे-जे आरोप झालेत, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. तर युतीची सत्ता आल्यानंतर १९९९ सालापासून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती आणि तशी स्वप्ने पडू लागली होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलाय. दरम्यान, १९९९ च्या निवडणूक निकालानंतर त्यांचे नाव पुढे येईना, मुख्यमंत्रिपदासाठी म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. इतकंच नाहीतर नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली. तसं पाहिला गेलं तर राजकीय महत्वकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही पण त्यामागचा हेतू काय हे सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे असते, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मात्र उद्धव ठाकरेंना जनहितापेक्षाही पद महत्त्वाचे वाटते, असे म्हणत फडणवीसांनी हल्लाबोल केला. यावेळी अजित पवार यांच्यावर झालेल्या आरोपांवर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.

Published on: May 13, 2024 09:08 AM