एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेवरुन देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन बी काय?

एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेवरुन देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन बी काय?

| Updated on: Oct 29, 2023 | 8:05 AM

tv9 Marathi Special Report | मुख्यमंत्री शिंदेंच्या अपात्रतेवरुनही फडणवीसांनी TV9च्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. शिंदे अपात्र होणारच नाहीत. पण अपात्र झाले तरी विधान परिषदेवरुन येऊन तेच मुख्यमंत्री होतील असा प्लॅनच फडणवीसांनी tv9च्या मुलाखतीत उघड केला.

मुंबई, २९ ऑक्टोबर २०२३ | शिंदेंच्या अपात्रतेवरुन फडणवीसांनी भाजपचा प्लॅन बी सांगितला आहे. शिंदे अपात्र झाले तरी विधान परिषदेवर येणार आणि मुख्यमंत्रीच राहणार, असं फडणवीस म्हणालेत. तर अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदावरुनही फडणवीसांनी स्पष्टता आणलीय. मुख्यमंत्री शिंदेंच्या अपात्रतेवरुनही फडणवीसांनी TV9च्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. शिंदे अपात्र होणारच नाहीत. पण अपात्र झाले तरी विधान परिषदेवरुन येऊन तेच मुख्यमंत्री होतील असा प्लॅनच फडणवीसांनी tv9च्या मुलाखतीत उघड केला. मी पुन्हा येईनच्या व्हिडीओनंतर TV9च्या मुलाखतीत फडणवीसांनी स्प्षट केलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार आणि पूर्ण टर्म पूर्ण करणार. तर पुन्हा येईनचा व्हिडीओ, भाजपच्या सोशल मीडिया हँडल करणाऱ्याने टाकला. तो टाकायला नको होता. त्यामुळं आपणच डिलिट करायला लावल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. मी पुन्हा येईनचा व्हिडीओ, हा मुख्यमंत्री शिंदे किंवा अजित पवारांना इशारा देण्यासाठी आहे अशीही चर्चा रंगली होती. मात्र इशारा देणाच्या वेगळ्या पद्धती आहेत. असंही सूचक वक्तव्य फडणवीसांनी केलेय.

Published on: Oct 29, 2023 08:05 AM