‘आमचं ठरलं…’, म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या भेटीत काय झालं थेट सांगितलं
VIDEO | देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं 'शिवतीर्था'वरील राज ठाकरे यांच्या भेटीत काय झालं?
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी काल रात्री साडे १० च्या सुमारास त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले होते. रात्री उशिरा झालेल्या भेटीमागे काहीतरी नक्की महत्त्वाचं कारणं असल्याची चर्चा होती. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेची भाजपसोबत युती होईल, अशी चर्चा असताना गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी भाजपने घेतलेल्या काही भूमिकांवर टीका केली होती. त्यामुळे या दोघांमध्ये झालेल्या भेटीत नेमकी कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली याची सर्वांना उत्सुकता होती. तर काल रात्री शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्याशी अराजकीय गप्पा झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस रात्रीच्या भेटीवर स्पष्टच म्हणाले की, ‘बऱ्याच दिवसांपासून आमचं ठरलं होतं की एक दिवस गप्पा मारायला बसू. त्यामुळे कालचा मुहुर्त निघाला. आम्ही गप्पा मारण्यासाठी बसलो होतो. असे ठरले होते की, या भेटीत राजकीय विषय सोडून गप्पा मारायच्या…’, असे फडणवीस म्हणाले.