शरद पवार यांनी भाकरी फिरवली? देवेंद्र फडणवीस यांनी थेट म्हटलं… ‘भाकरी फिरलेली नाही तर…’
VIDEO | राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षांच्या निवडीवर देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. राष्ट्रवादी पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिल्लीत शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. तर सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाबचीही जबाबदारी देण्यात आली आहे. शरद पवार यांनी केलेल्या घोषणेत अजित पवार यांचं कुठेही नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांना कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केले. मात्र शरद पवार यांनी भाकरी फिरवली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ‘याला भाकरी फिरवणे म्हणत नाहीत ही तर धूळफेक आहे, असे फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले हा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे ते बघून घेतली’, असे फडणवीस म्हणाले.