‘त्यांना प्रत्युत्तर द्यावं इतके ते प्रगल्भ नाही’, आदित्य ठाकरे यांना कुणी लगावला खोचक टोला
VIDEO | आदित्य ठाकरे यांना अजून खूप शिकायचंय, आदित्य ठाकरे यांच्या 'त्या' टीकेवर भाजप नेत्याचं प्रत्युत्तर
अयोध्या : मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे मंत्री, आमदार हे फक्त दिखाऊगिरीसाठी अयोध्या दौरा करत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदारआदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना म्हणाले की, राज्यात रावण राज्य चालवून हे अयोध्येला चालले आहेत अशी जहरी टीका त्यांनी केली होती. त्यावर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यावर भाष्य करताना म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना अजून खूप शिकायचं आहे, त्यांना प्रत्युत्तर द्यावं इतके ते प्रगल्भ नाही, असा खोचक टोलाही लगावला आहे. तर अयोध्येत राम मंदिर निर्माण होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचं स्वप्न पूर्ण केलं आहे, असेही फडणवीस म्हणाले आहे.