कोण संजय राऊत? पंतप्रधान मोदींवर केलेल्या 'त्या' टीकेवरून फडणवीसांचा पलटवार

कोण संजय राऊत? पंतप्रधान मोदींवर केलेल्या ‘त्या’ टीकेवरून फडणवीसांचा पलटवार

| Updated on: Mar 20, 2024 | 7:52 PM

'महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला. जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूच्या गावात औरंगजेब जन्माला आला म्हणून...', मोदींवर केलेल्या 'त्या' टीकेवरून फडणवीसांचा पलटवार काय?

मुंबई, २० मार्च २०२४ : औरंगजेबी वृत्ती गुजरात, दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येते, असं वक्तव्य करत ठाकरे गटाते नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर नाव न घेतला हल्लाबोल केला. संजय राऊत यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी कोण संजय राऊत असा खोचक सवाल केलाय. ‘महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला. जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूच्या गावात औरंगजेब जन्माला आला म्हणून औरंगजेबी वृत्ती गुजरात, दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येते. मोदी नाही औरंगजेब म्हणा’, असा निशाणाही संजय राऊत यांनी लगावला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केलाय. ‘कोण संजय राऊत? संजय राऊत या माणसाबद्दल तुम्ही मला विचारता माझी तर प्रतिमा ठेवा.’

Published on: Mar 20, 2024 07:52 PM