फडणवीसांकडून आदित्य ठाकरेंचा ‘बाळराजे’ उल्लेख, काय केली शेलक्या शब्दांत टीका?

फडणवीसांकडून आदित्य ठाकरेंचा ‘बाळराजे’ उल्लेख, काय केली शेलक्या शब्दांत टीका?

| Updated on: Mar 11, 2024 | 2:04 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उदघाटनप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेच्या दोन निवडणुका या कोस्टल रोडचं प्रझेंटेशन दाखवूनच उद्धव ठाकरेंनी पार पाडल्या, असा टोला त्यांनी लगावला.

मुंबई, ११ मार्च २०२४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आज मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं उद्धाटन करण्यात आलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उदघाटनप्रसंगी बोलताना या किनारी रस्त्याची एक लेन आपण आजपासून चालू करत असून लवकरच संपूर्ण रस्ता चालू करणार असल्याचं आश्वासन मुंबईकरांना दिलं. तर सध्या सुरू करण्यात येणाऱ्या या एका लेनमुळे मुंबईकरांना खूप फायदा होणार आहे. हे सांगत असताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. ‘काल सोशल मीडियावर उबाठाचे बाळराजे सांगत होते की, कोस्टल रोड आम्ही केला आणि आमच्या कामाचे श्रेय ते घेत आहेत. त्यामुळे मी त्यांना सांगतो की, आम्ही दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणारे नाहीत. जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो’, असे म्हणत शेलक्या शब्दांत फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली तर मुंबई महापालिकेच्या दोन निवडणुका या कोस्टल रोडचं प्रझेंटेशन दाखवूनच उद्धव ठाकरेंनी पार पाडल्या. कोस्टल रोड मात्र कधी झालाच नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनाही फडणवीसांनी टोला लगावला.

Published on: Mar 11, 2024 02:04 PM