मूर्खांना मी उत्तर देत नाही, देवेंद्र फडणवीस यांनी ‘तो’ फोटो ट्वीट करण्याचं कारण सांगत कुणाला फटकारलं?
नागपुरहून अयोध्येत जात असतानाचा स्वत: चा फोटो देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट केला. हा फोटो ट्वीट करून अयोध्या कारसेवेला गेल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुरावा दिला आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.
नागपूर, २१ जानेवारी २०२४ : देवेंद्र फडणवीसांनी नागपुरहून अयोध्येत जात असतानाचा स्वत: चा फोटो टि्वट केला. हा फोटो ट्वीट करून अयोध्या कारसेवेला गेल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुरावा दिला आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. तुमचा फोटो हा नागपूरच्या स्टेशनवरचा फोटो आहे. आमच्याकडे घुमटावरचे फोटो, व्हीडिओ आहेत. तुम्ही नागपूर स्टेशनवर फिरायला गेला असाल, असे राऊत यांनी म्हणत जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी जशाच तसं उत्तर देत संजय राऊत यांना फटकारले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी मुर्खांना उत्तर देत नाही. त्यामुळे त्यांना कुठलंही उत्तर नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘जुनी आठवण असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी त्या फोटोला शेअर केले आहे.
Published on: Jan 21, 2024 04:31 PM
Latest Videos