Devendra Fadnavis : '...तर त्यात चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', बटेंगे तो कटेंगेवरून फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis : ‘…तर त्यात चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो’, बटेंगे तो कटेंगेवरून फडणवीसांचा घणाघात

| Updated on: Nov 18, 2024 | 1:30 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यादरम्यान, कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे आणि एक रहेंगे तो सेफ रहेंगे यावर सवाल करण्यात आला. यावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “देशाचे पंतप्रधान जर एकत्र राहा म्हणजे आपण सेफ राहू असे सांगत असेल तर त्यात चुकीचे काय? कोणत्याही देशाचा पंतप्रधान एकत्र राहा तर सुरक्षित राहू, असेच सांगत असेल तर त्याची मिरची लागण्याचे कारण काय. शरद पवारांमध्ये लपलेला जातीवाद हा उफाळून येतो”, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले. दरम्यान, कटेंगे तो बटेंगे हा भाजपचा नारा आहे. यावर शरद पवार टीका करताय. दरम्यान, महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचाच या नाऱ्याला विरोध असल्याचे अनेक सभांमधून पाहायला मिळत आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणले, ‘दादा दुसऱ्या पक्षातून महायुतीत आलेत. त्यांनी असं म्हटलं कटेंगे तो बटेंगे हे सेफ नाहीये तर एक है तो सैफ है हे ठीक आहे. विचारसरणी जुळली असती तर त्यांचा वेगळा पक्ष राहिला नसता त्यांच्या… आमची त्यांची राजकीय युती आहे.’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Published on: Nov 18, 2024 01:30 PM