ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना मानसोपचार…, भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
मोदींकडून उद्धव ठाकरेंचा नकली संतान असा उल्लेख करण्यात आलाय. उद्धव ठाकरेंवर बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेनेनंतर नकली संतान अशी टीका केली. यावर ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय.
उद्धव ठाकरे यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे. इतकंच नाहीतर उद्धव ठाकरे यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे त्वरीत नेलं पाहिजे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर ठाकरेंचा तोल ढळलेला आहे, असे म्हणत फडणवीसांनी हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करू शकत नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मोदींकडून उद्धव ठाकरेंचा नकली संतान असा उल्लेख करण्यात आलाय. उद्धव ठाकरेंवर बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेनेनंतर नकली संतान अशी टीका केली. मोदींच्या टीकेवर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘नकली? हा माझा अपमान नाही, तर देवतासमान माझी आई आणि माझे वडील बाळासाहेब यांचा अपमान आहे.’