अजित पवार यांनी केलेलं ‘ते’ बंड नव्हतं? देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट
VIDEO | माझ्यासोबत दोनदा विश्वास घात झाला... राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केला गौप्यस्फोट?
मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जे राजकीय नाट्य बघायला मिळालं त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले. त्यावेळी तयार झालेलं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही तासांच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.. पण अजित पवार यांचं ते बंड होतं का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. “पहाटेच्या शपथविधीच्यावेळी अजित पवार यांचं बंड होतं का? इथूनच सुरुवात होईल. मला असं वाटतं की, तुमच्याकडे अजित दादा येवून गेले आहेत. त्यांनी बऱ्याच प्रश्नांवर नो कमेंट्स केलंय. त्यामुळे काही करता का होईना त्यांनी माझ्यासोबत शपथविधी घेतली होती. त्यामुळे काही पथ्य मीसुद्धा पाळली पाहिजेत. त्यामुळे काही कमेंट त्यांना करुद्या. त्यानंतर उर्वरित कमेंट मी करतो”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.