तुम्हाला अर्धच समजलंय; अजून बरेच गौप्यस्फोट बाहेर येणार, देवेंद्र फडणवीस यांचा सूचक इशारा
VIDEO | 'मी जे बोललो ते कसं खरं होतं, हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर येतील', देवेंद्र फडणवीस यांनी काय दिला इशारा?
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित राज्यस्तरीय महसूल परिषदेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले. सकाळच्या शपथविधीवर हळूहळू गौप्यस्फोट होताहेत. मी जे बोललो ते कसं खरं होते, ते हळूहळू समजतंय. आतापर्यंत अर्धच समजलंय. मी काहीही बोललो तर समोरून दुसरी गोष्ट बोलली जाते. त्यामुळे गोष्टी बाहेर येतात. असंच हळूहळू सगळ्या गोष्टी मी बाहेर आणेन, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला आहे. राष्ट्रवादीतील भावी मुख्यमंत्री पदाच्या पोस्टरबाजीवर बोलताना फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीत ही पद्धत आहे. भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री असं सांगत असतात. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. माझ्या अनुभवातून मी शिकलोय. कधी काहीही होवू शकते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असं कोणाला वाटलं होतं का? ज्याला ज्याला जो भावी वाटतो त्याला शुभेच्छा, असंही फडणवीस यांनी म्हंटलं.