डॉ. देवेंद्र फडणवीस... थेट परदेशातून गौरव, डॉक्टरेट पदवीनं DCM सन्मानित

डॉ. देवेंद्र फडणवीस… थेट परदेशातून गौरव, डॉक्टरेट पदवीनं DCM सन्मानित

| Updated on: Dec 26, 2023 | 5:35 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आले आहे. १२० वर्षांच्या इतिहासात जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून प्रथमच मानद डॉक्टरेट मिळवणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच आहेत. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा हा गौरव

मुंबई, २६ डिसेंबर २०२३ : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आले आहे. तर जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे आज मुंबई विद्यापीठात देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. १२० वर्षांच्या इतिहासात जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून प्रथमच मानद डॉक्टरेट मिळवणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच आहेत. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा हा गौरव करण्यात आला आहे. जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टर पदवी मिळवणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे. आज मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Published on: Dec 26, 2023 05:29 PM