अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आवडेल का? अमृता फडणवीस थेट म्हणाल्या...

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आवडेल का? अमृता फडणवीस थेट म्हणाल्या…

| Updated on: Apr 23, 2023 | 8:45 AM

VIDEO | राजकारणी लोक अनेक ठिकाणी डोळे मारत असतात, अमृता फडणवीस यांनी नाव न घेता नेमका काय लगावला अजित पवार यांना टोला, बघा...

मुंबई : गेल्या दोन आठवड्यांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काही न् काही कारणांवरून चर्चेत आहे. त्यातच अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदावरून उघडपणे इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आवडेल का? असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विचारला असता त्यांनी थेट उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. मला कोणीही मुख्यमंत्री झाले तर आवडेल महाराष्ट्रासाठी 24 तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल. अजित पवार जर भाजपमध्ये आले आणि त्यांनी भाजपमध्ये येऊन मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या, ‘मला वाटतं महाराष्ट्र आपलं असा राज्य आहे, जे खूप काही करू शकतं आणि खूप काही करतं आहे, यासाठी जो माणूस मुख्यमंत्री होऊ इच्छित आहे आणि जनतेला जे ठीक वाटेल आणि जर तो व्यक्ती न्याय देऊ शकेल असं वाटलं तर ते चांगला आहे तर मग तो कोणीही असला तरी चालेल’

Published on: Apr 23, 2023 08:40 AM