DCM Eknath Shinde : ‘मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?’, ‘एसंशिं’ वर एकनाथ शिंदे संतापले
Thackeray - Shinde Dispute : 'एसंशिं' या उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अपभ्रंशावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापलेले बघायला मिळाले.
उद्धव ठाकरेंच्या यांच्या ‘एसंशिं’ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून युज अँड थ्रो असं उत्तर देण्यात आलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘एसंशिं’च्या टीकेला आता एकनाथ शिंदे यांनी आज संतापून उत्तर दिलं आहे.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘एसंशिं’ म्हणजे काय? मी युटी म्हणू का? युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का? असं शिंदेंनी म्हंटलं आहे. वापरा आणि फेका ही त्यांची नीति आहे. मला बोलायला लावू नका, असंही शिंदेंनी यावेळी म्हंटलं आहे. घर का ना घाट का अशी ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था झाली असल्याचंही शिंदेंनी म्हंटलं आहे.
Published on: Apr 03, 2025 05:11 PM
Latest Videos

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
