एकनाथ शिंदे अद्याप अडूनच... गृहखात्यासाठी शिंदे-फडणवीस यांच्यात रस्सीखेच, महायुतीत नेमकं काय शिजतंय?

एकनाथ शिंदे अद्याप अडूनच… गृहखात्यासाठी शिंदे-फडणवीस यांच्यात रस्सीखेच, महायुतीत नेमकं काय शिजतंय?

| Updated on: Dec 10, 2024 | 11:44 AM

सुधीर मुनगंटीवार कितीही म्हणत असले की एकनाथ शिंदे गृहखात्यावरून आग्रही नाहीत. तरी एकनाथ शिंदे यांनी अद्याप त्यावरून दावा सोडलेला नाही. वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सव्वा तास बैठक झाली. पण गृहखात्यावरून तोडगा काही निघालेला नाही.

विशेष अधिवेशन संपलं आणि आता मंत्रिमडळाच्या विस्ताराकडे नजरा लागल्या आहेत. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहखात्यावरून दावा सोडण्यास तयार नसल्याची माहिती आहे. सुधीर मुनगंटीवार कितीही म्हणत असले की एकनाथ शिंदे गृहखात्यावरून आग्रही नाहीत. तरी एकनाथ शिंदे यांनी अद्याप त्यावरून दावा सोडलेला नाही. वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सव्वा तास बैठक झाली. पण गृहखात्यावरून तोडगा काही निघालेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहखात्यावर ठाम असल्याची माहिती आहे. नुकत्याच वर्षावर झालेल्या सव्वा तासांच्या बैठकीत खातेवाटपावरून अंतिम तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तारही आणखी दोन ते तीन दिवस लांबणार असल्याची शक्यता असून १४ तारखेला विस्तार होणार असल्याचे म्हटलं जात आहे. गृहखात्याऐवजी भाजपने एकनाथ शिंदेंना नगरविकास, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची ऑफर दिल्याचे कळतेय. पण गेल्या सरकारमध्ये गृहखातं उपमुख्यमंत्र्यांकडे होतं म्हणून आताही तोच फॉर्म्युला हवाय. असा तर्क शिवसेनेकडून दिला जातोय. तर विधानपरिषदेत खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा ठाकरेंचे अनिल परब यांनीही उपस्थित केला. बघा काय म्हणाले अनिल परब?

Published on: Dec 10, 2024 11:44 AM