Ekmath Shinde : नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालपासून त्यांच्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावात मुक्कामी आहेत. तर आज एकनाथ शिंदे आपल्या नातवासोबत शेताची पाहणी केली आणि फेरफटका मारताना दिसले.
नागपुरातील हिवाळी अधिवेशन, मंत्रिमंडळाचे खाते वाटप या धकाधकीच्या कामानंतर थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळगावी जाऊन थोडा विसावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालपासून त्यांच्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावात मुक्कामी आहेत. तर आज एकनाथ शिंदे आपल्या नातवासोबत शेताची पाहणी केली आणि फेरफटका मारताना दिसले. इतकंच नाहीतर यावेळी एकनाथ शिंदेंनी नातवासोबत ट्रॅक्टरही चालवला. उपमुख्यमंत्र्यांना जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा ते गावाकडे जातात शेताची पाहणी करतात आणि शेतकामात रमतात. आज एकनाथ शिंदे यांनी शेतात जाऊन बांबू, चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. मागील काही वर्षांमध्ये आपल्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीत लक्ष घालून एकनाथ शिंदे यांनी आपली शेती चांगल्या पद्धतीने विकसित केली असल्याचे पाहायला मिळाले. यावेळेस एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावी जाऊन आपल्या नातवासह शेत-शिवारात फेरफटका मारल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये त्यांनी आपलया नातवाला घेऊन शेती आणि मातीची पाहणी केली.