DCM Eknath Shinde : टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक
Eknath Shinde Praise Shahajibapu Patil : सांगोला येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापू पाटील यांच कौतुक केलं आहे.
सांगोल्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापू पाटील यांचं कौतुक केलं आहे. टायगर अभी जिंदा है.. असं म्हणत शिंदेंनी शहाजीबापू यांचं कौतुक केलं आहे. आम्ही उठाव केला तेव्हा शहाजी बापू यांच्या काय ती झाडी, काय ते डोंगर या कवितेने आम्ही हसायचो असं एकनाथ शिंदे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एखादी मॅच हारला म्हणून विराटची बॅट कधी थंड पडत नाही. बापूसाठी मी एकच शब्द बोलेन, की टायगर अभी जिंदा है. मी शहाजीबापू पाटील यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा पाहिल्या दिवसापासून बापू माझ्या बाजूला खांद्याला खांदा लाऊन पहाडासारखे उभे होते. आम्ही सगळे ताणात होतो, मात्र बापू विनोद करायचे. काय ती झाडी, काय ते डोंगर.. बापूचा डायलॉग आजसुद्धा फेमस आहे, असं शिंदेंनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.