Eknath Shinde : ‘संजय राऊतांना लवकर उपरती आली’, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते आणि भाजपच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील ठाकरे गटाबाबत सावध प्रतिक्रिया देताना दिसताय. निवडणुकीपूर्वी एकमेकांवर टीकास्त्र डागणाऱ्या भाजप आणि ठाकरे गटाच्या भेटीगाठी चांगल्याच वाढल्यात. तसंच भाजपबद्दल ठाकरे गटाच्या मवाळ झालेल्या भूमिकेवरूनही राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी […]
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते आणि भाजपच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील ठाकरे गटाबाबत सावध प्रतिक्रिया देताना दिसताय. निवडणुकीपूर्वी एकमेकांवर टीकास्त्र डागणाऱ्या भाजप आणि ठाकरे गटाच्या भेटीगाठी चांगल्याच वाढल्यात. तसंच भाजपबद्दल ठाकरे गटाच्या मवाळ झालेल्या भूमिकेवरूनही राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमचा कम्युनिकेशन गॅप झाला. त्यामुळे आधीची युती तुटली असं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांना प्रत्युत्तर देत त्यांना आता आठवण झाली का? असा खोचक सवाल केला. “बैल गेला आणि झोपा केल्या अशी अवस्था झाली आहे. तेलही गेलं आहे आणि तूपही गेलं आहे. पुढचं मी काही बोलत नाही. उपरती लवकर सुचली. 2019 च्या निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेने क्लिअर माईंडेड मतदान केलं होतं. पण काहींनी स्वार्थासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. त्यांना स्मारकाकडे निमंत्रण देणार नाही. स्मारक हे शासन बनवत आहे. बाळासाहेब हे एकट्याचे नाहीत. लोकनेते म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांचे धोरण होते. ज्यांनी त्यांचे विचार सोडले त्यांना विधानसभेमध्ये लोकांनी धडा शिकवला. आता काय बोलून त्याचा उपयोग. जो बुंद से गई वो हौद से नही आती”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.