‘सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं…’, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
'माझ्यावर उठसूट आरोपही केले जात होते. मलाच नव्हे तर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खालच्या थरावर आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांना तुरंगात टाकण्याचे प्रयत्न केले. तू राहील नाहीतर मी राहील अशी भाषा केली. अजून काय काय बोलले मी ते सांगू शकत नाही', शिंदे बघा काय म्हणाले?
‘सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने रंग बदलणारे पाहिले नाहीत’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हणत उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना खालच्या पातळीवर आरोप केले होते. काय बदल झाला आणि काय जादू झाली ते आपण पाहतोय, असंही एकनाथ शिंदें म्हणाले. ‘मी मुख्यमंत्री असताना मला रोज शिव्या दिल्या जात होत्या. माझ्यावर उठसूट आरोपही केले जात होते. मलाच नव्हे तर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खालच्या थरावर आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांना तुरंगात टाकण्याचे प्रयत्न केले. तू राहील नाहीतर मी राहील अशी भाषा केली. अजून काय काय बोलले मी ते सांगू शकत नाही. पण आता पाहा काय बदल झाला? काय जादू झाली?’, असा खोचक सवालही एकनाथ शिंदे यांनी केला. एकनाथ शिंदे आज ठाण्यात होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना बोलत होते. पुढे ते असेही म्हणाले, सरडे रंग बदलतात. पण एवढे फास्ट वेगाने रंग बदलणारे सरडे मी पाहिले नाहीत, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांचे विचार मानणारे येतील. त्यांचे विचार सोडणाऱ्यांचा संबंध नाही, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. ठाकरेंच्या या विधानाचाही शिंदेंनी समाचार घेतला. ‘अरे कार्यक्रम कुणाचा आहे? बाळासाहेबांचं स्मारक कोण बांधतोय? सरकार बांधतंय. बाळासाहेबांचं स्मारक हे कुणाच्या मालकीचं नाही. त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही’, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.