ससूनमधूनन ललित पाटीलला पळवून लावण्यात डीन संजीव ठाकूर यांचा हात? ससूनच्या डीननं स्पष्टच म्हटलं…
ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे सातत्याने ससून रूग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप करत आहे. ससूनमधून ललित पाटील फरार होण्यामागे संजय ठाकूर यांचा हात असल्याचा थेट आरोप करण्यात त्यांच्यावर आला होता. यावर ससूनच्या डीनचं स्पष्टीकरण दिले आहे.
पुणे, ४ नोव्हेंबर २०२३ | ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे सातत्याने ससून रूग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप करत आहे. दरम्यान, आज त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. ससूनमधून ललित पाटील फरार होण्यामागे संजय ठाकूर यांचा हात असल्याचा थेट आरोप करण्यात त्यांच्यावर आला होता. यावर ससूनच्या डीनचं स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी ते म्हणाले, ‘मला कोणत्याही राजकीय नेत्यानं फोन केला नाही. कुठल्याही आरोपीला तशी ट्रिटमेंट दिली जात नाही. मी माझ्या कामात असतो. मला अनेक ऑपरेशन करायचे आहेत. त्यामुळे आरोप करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत वेळ मिळाल्यावर निर्णय घेणार, माझी कायदे तज्ज्ञांशी चर्चा सुरू असून याबाबतचा निर्णय घेईन. ‘ तर ससून रूग्णालयातून ललित पाटीलला पळवून लावण्यात डीन संजीव ठाकूर यांचा हात असल्याचा आरोपही करण्यात आला. यावर बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.