नागपुरातील सूर्याचा अस्त; आता बॉम्ब शोधणार कोण? पोलीस दलाला चिंता
नागपुरातील सुर्या नावाच्या श्वानाचा मृत्यू झाला आहे. तो नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकामध्ये कार्यरत होता. त्याने अनेक प्रकरणात पोलिसांना मदत केली आहे. त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नागपुरातील सूर्याचा अस्त झाला. हा सूर्या म्हणजे पोलीस दलात कार्यरत असलेला सूर्या नावाचा श्वान होता. कुत्र्याच्या मृत्यूची बातमी होऊ शकते का, तर हो. हा कुत्रा विशेष होता. कारण यानं बॉम्ब शोधण्यासाठी नागपूर पोलीस दलात काम केलंय. त्यामुळं या सूर्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारही करण्यात आलेत. सूर्या हा कुत्रा नागपूर पोलीस दलात कार्यरत होता. पण, गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्याला मूत्रपिंडाचा त्रास होता. त्यावर उपचारही सुरू होते. पण, तीन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळं त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Latest Videos