नितीन गडकरी यांना 'या' जेलमधून आला धमकीचा फोन, कोणी दिली धमकी?

नितीन गडकरी यांना ‘या’ जेलमधून आला धमकीचा फोन, कोणी दिली धमकी?

| Updated on: Jan 16, 2023 | 7:51 AM

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आला. या फोनवरून तब्बल २ कोटी रूपये खंडणीची मागणी करण्यात आली. पण ही धमकी कोणी दिली? कुठून करण्यात आला गडकरी यांना धमकीचा फोन? बघा टीव्ही 9 चा स्पेशल रिपोर्ट...

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नागपूर येथे असणाऱ्या गडकरींच्या कार्यालयात तीन वेळा धमकी देणारे कॉल आलेत. हे धमकीचे फोन बेळगावच्या जेलमधून करण्यात आले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने हा फोन करण्यात आला. इतकेच नाही तर त्यावर तब्बल २ कोटी रूपये खंडणीची मागणी करण्यात आली. पण ही धमकी कोणी दिली? कुठून करण्यात आला गडकरी यांना धमकीचा फोन? बघा टीव्ही 9 चा स्पेशल रिपोर्ट…

नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच पोलीस यंत्रणांसह सर्वच तपास यंत्रणा सतर्क झाल्या आणि धमकीचा फोन नेमका कोणी केला त्या व्यक्तीचा तपास करणं वेगानं सुरू झालं. या तपासून गडकरींना धमकीचा फोन हा बेळगावमधून आल्याचे समोर आले. बेळगाव येथील बेळगाव सेंट्रल जेल हे नागपूरपासून तब्बल हजार किमीवर आहे. जयेश कानथा या नावाच्या व्यक्तीने गडकरी यांना धमकीचा फोन केला होता. पण त्यामागे नेमके काय कारण होते? त्याने कोणाच्या सांगण्यावरून गडकरी यांना धमकी दिली, हे जाणून घेण्यासाठी बघा हा व्हिडिओ…

Published on: Jan 16, 2023 07:51 AM