नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, कोणी केला फोन?

नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, कोणी केला फोन?

| Updated on: Jan 14, 2023 | 2:13 PM

तब्बल २ कोटी रूपये खंडणीच्या मागणीसाठी केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन. कोणी दिली जीवे मारण्याची धमकी?

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नागपूरातील कार्यालयात नितीन गडकरी यांना दोनदा फोन करून धमकी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने हा धमकीचे फोन आले असून तब्बल २ कोटी रूपये खंडणीची मागणी करण्यात आली आहे.

नागपूर येथील कार्यालयात आज, शनिवारी सकाळी हे धमकीचे फोन आले असून पहिला फोन ११.३० वाजता आणि त्यानंतर दुसरा फोन १२.४० वाजता आल्यानंतर नितीन गडकरींच्या नागपुरातील कार्यालयात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हे धमकीचे फोन कोणी केले, कुठून करण्यात आले, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Published on: Jan 14, 2023 02:08 PM