पुन्हा मनसे नेत्याच्या मुलाला धमकी, कुणाला मिळाली जीवे मारण्याची धमकी?

पुन्हा मनसे नेत्याच्या मुलाला धमकी, कुणाला मिळाली जीवे मारण्याची धमकी?

| Updated on: May 03, 2023 | 8:24 AM

VIDEO | पुणे मनसे शहराध्यक्षाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, कोंढवा पोलिसात तक्रार दाखल

पुणे : गेल्या काही दिवसांपर्वी पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. वसंत मोरे यांच्या मुलाचं बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार आज समोर आला होता. खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली असून वसंत मोरे यांचा मुलगा रुपेशचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवत फसवणूक करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर आजही पुण्यात राजकीय नेत्यांना धमकी देण्याचा प्रकार समोर येत आहे. आता पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या मुलाला धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. साईनाथ बाबर यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणी पुण्यातील कोंडवा पोलिसात तक्रार दाखल कऱण्यात आल्याची माहिती साईनाथ बाबर यांनी दिली.

Published on: May 03, 2023 08:20 AM