‘तुमचा संतोष देशमुख मस्साजोग करू…’, तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना थेट पत्र अन् जीवे मारण्याची धमकी
तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धनंजय सावंत आणि केशव सावंत यांच्या जीवाला धोका असून त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुमचाही संतोष देशमुख केला जाईल अशी धमकी पत्रातून देण्यात आली.
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धनंजय सावंत आणि केशव सावंत यांच्या जीवाला धोका असून त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुमचाही संतोष देशमुख केला जाईल अशी धमकी पत्रातून देण्यात आली. यापूर्वी धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबारची घटना घडली आहे. तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग करू असं अज्ञातांकडून शंभरच्या नोटेसह धमकीच पत्र आल आहे. धनंजय सावंत आणि केशव सावंत यांच्याकडून ठोकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकी आधी धनंजय सावंत यांच्या घरावर गोळीबार झाला होता. धनंजय सावंत धारशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. सोनारी येथे धनंजय सावंत यांचा भैरवनाथ साखर कारखाना आहे. तर केशव सावंत तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर अडवत दोघांनी चालकाला बंद पाकीट दिलं. याबंद पाकिटात जीवे मारण्याच्या धमकीच पत्र होतं. दरम्यान, या घटनेनंतर कोणावर काय संशय घ्यावा हेच कळत नाही याच्यासाठीच मी येणाऱ्या दोन दिवसांमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे धारशिव जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी म्हटले.