करमुसे मारहाणप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून आज निर्णय, जाणून घ्या दिवसभरातील मोठ्या घडामोडी

करमुसे मारहाणप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून आज निर्णय, जाणून घ्या दिवसभरातील मोठ्या घडामोडी

| Updated on: Feb 24, 2023 | 10:54 AM

VIDEO | पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दिग्गज नेते ठाण मांडून, बघा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाकडून निर्णय समोर येणार असून राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप…पोटनिवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात भाजप, काँग्रेससह अपक्ष उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लगबग सुरू आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दिग्गज नेते ठाण मांडून आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अजित पवार उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. जर अपात्रतेचा निकाल आला तर राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या ऑनलाईन भाषणात जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीकडून धार्मिक ध्रवीकरण, मोदींना हटवण्यासाठी मुस्लिमांनाही मतदानासाठी आणा म्हणताय, काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे.

Published on: Feb 24, 2023 10:52 AM