छत्रपती संभाजीराजेंबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असेल- उदय सामंत
वर्षावर उद्या या आणि शिवबंधन बांधा असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी काल स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati ) यांना दिला होता. त्यामुळे शिवसेना संभाजी छत्रपती यांना राज्यसभेचे अपक्ष (Rajyasabha Eleciton) उमेदवार म्हणून पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
छत्रपती संभाजीराजेंबाबतचा निर्णय जो काही असेल तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. वर्षावर उद्या या आणि शिवबंधन बांधा असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी काल स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati ) यांना दिला होता. त्यामुळे शिवसेना संभाजी छत्रपती यांना राज्यसभेचे अपक्ष (Rajyasabha Eleciton) उमेदवार म्हणून पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती यांची कोंडी झाली आहे. मात्र, शिवसेनेत प्रवेश न करण्याच्या भूमिकेवर संभाजी छत्रपती ठाम असून त्यांनी मुख्यमंत्र्यांची ऑफर धुडकावल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार आता संभाजीराजेंच्यासाठी सरसावले असल्याचं चित्रं आहे. संभाजीराजेंना राज्यसभा नाकारणं हे राजकीय दृष्ट्या परवडणारं नाही, असं या आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.