Dilip Walse Patil | शाळा, कॉलेज 15 जुलैपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय : दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil | शाळा, कॉलेज 15 जुलैपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय : दिलीप वळसे पाटील

| Updated on: Jun 25, 2021 | 3:24 PM

शाळा आणि कॉलेज संदर्भात 15 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतील. लसीकरणाला गती मिळाली आहे, त्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तिसरी लाट ही चिंतेची बाब आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आहेच. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने भूमिका घ्यावी. बाहेर पडू नये, पर्यटनाला जाऊ नये, तिसऱ्या लाटेत लहान मुलं जास्त बाधित होऊ शकतील असा अंदाज आहे, असं मत वळसे पाटलांनी व्यक्त केलं.

सवलती दिल्यानंतर पॉझिटिव्ह रेट कमी झाला. मात्र सध्या सुरु असलेले निर्बंध कायम राहतील, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शाळा आणि कॉलेज संदर्भात 15 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतील. लसीकरणाला गती मिळाली आहे, त्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तिसरी लाट ही चिंतेची बाब आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आहेच. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने भूमिका घ्यावी. बाहेर पडू नये, पर्यटनाला जाऊ नये, तिसऱ्या लाटेत लहान मुलं जास्त बाधित होऊ शकतील असा अंदाज आहे, असं मत वळसे पाटलांनी व्यक्त केलं.