देशमुख आणि मलिकांच्या मतदानाच्या अर्जावर आज निर्णय
लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असे म्हणत अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांच्या एका दिवसासाठी जामीन मिळावा यासाठी केलेल्या याचिकांना विरोध केला.
मुंबई – लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असे म्हणत अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांच्या एका दिवसासाठी जामीन मिळावा यासाठी केलेल्या याचिकांना विरोध केला. 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी दोन्ही नेत्यांनी एक दिवसाचा जामीन मागितला होता. देशमुख आणि मलिक हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते सध्या वेगवेगळ्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाकडे तात्पुरता जामीन मागितला होता. हे प्रकरण न्यायालयात गेलं असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. आज अकरा वाजता सुनावणी होणार त्यामुळे ते मतदान करणार की नाही हे स्पष्ट होईल.
Published on: Jun 09, 2022 10:51 AM
Latest Videos