अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ बाप्पाच्या भोवताली अंब्यांचा दरवळ, बघा व्हिडीओ
VIDEO | अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 11000 आंब्याची आरास, बघा नेत्रदिपक सजावट
पुणे : अक्षय्य तृतीयेनिमित्त राज्यभरातील अनेक मोठी मंदिरं सजल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर देखील अक्षय्य तृतीयेनिमित्त सजले आहे. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत या मंदिरात आंब्याची आकर्षक आरास पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात करण्यात आली आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त साधत दरवर्षी बाप्पाला आंब्याची आरास करण्यात येते. यंदाही 11000 आंब्याची आरास करण्यात आली आहे. दरम्यान, या मंदिरात आंब्याचा प्रसादही बाप्पाला चढवण्यात आला आहे. दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात आज सकाळपासूनच गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागलेली पाहायला मिळत आहे. अक्षय्य तृतीयेनिमित्त मंदीरात भक्तांची मोठी गर्दी असून बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पुणेकर सकाळपासूनच श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दाखल झाले आहेत.