मानाच्या कसबा गणपतीच्या भवताली हापूस आंब्यांची दरवळ, बघा आकर्षक सजावट
VIDEO | सोलापूर येथे आंबा महोत्सवानिमित्त मानाच्या कसबा गणपतीला हापूस आंब्याची आकर्षक आरास, बघा व्हिडीओ
सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध श्रीमंत मानाचा कसबा गणपती प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी अंबा महोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी आंबा महोत्सवाचे चौथे वर्ष असून भक्तांकडून लाडक्या गणराया चरणी आंबा वाहण्यात आला. यंदाच्या आंबा महोत्सवात 125 डझन देवगड हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे. ही आरास पाहण्यासाठी आणि गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांची मोठी गर्दी पहायला मिळाली. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेला या आंबा महोत्सवाची सांगता करण्यात येते. यावेळी गोरगरीब कष्टकरी कामगार यांना हा देवगड हापूस आंबा प्रसाद म्हणून देण्यात येतो. यासह महाप्रसादाची व्यवस्था ही करण्यात आल्याची माहिती कसबा गणपती प्रतिष्ठानचे प्रमुख चिदानंद मुस्तारे यांनी दिली.
Published on: Apr 21, 2023 06:20 AM
Latest Videos