संत शिरोमणी देव मामलेदार महाराजांच्या मंदिराच्या गाभाऱ्यास 171 किलो द्राक्षांचा आरास
सटाणा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सागर पंढरीनाथ येवला यांच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ग्रामदैवत संतशिरोमनी (sant shiroman) देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात 171 किलो रसाळ द्राक्षांची (Grapes) आरास मांडण्यात आली होती.
सटाणा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सागर पंढरीनाथ येवला यांच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ग्रामदैवत संतशिरोमनी (sant shiroman) देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात 171 किलो रसाळ द्राक्षांची (Grapes) आरास मांडण्यात आली होती. ही आरास बघून दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे मन आनंदाने बहरून आले होते.दिवसभर महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आकर्षक व देखीनी द्राक्षांची आरास बघून या आरास समवेत सेल्फी फोटो घेण्याचा मोह आवरला गेला नाही.श्रीमती मंगला पंढरीनाथ येवला (yevla) यांचे गेल्यावर्षी वयाच्या 61 व्या वर्षी निधन झाले होते. कोविड परिस्थिती मुळे कुटुबीयांना कोणतेही धार्मिक कार्यक्रम करता आले नव्हते. आईच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त ग्रामदैवताच्या मंदिराच्या गाभाऱ्यात येवला कुटुंबीयांनी १७१ किलो द्राक्षांची आकर्षक व देखनी आरास मांडली होती.