लाकूड व्यापाऱ्याच्या मुलीने उंचावली नांदेडकरांची मान; दीपा यांची सैन्यदलात निवड

लाकूड व्यापाऱ्याच्या मुलीने उंचावली नांदेडकरांची मान; दीपा यांची सैन्यदलात निवड

| Updated on: Nov 25, 2021 | 12:32 PM

घरची परिस्थिती हालाकीची असतानाही मुखेड येथील एका लाकूड व्यापाऱ्याच्या मुलीने गगनभरारी घेतली आहे. या मुलीने चीन सीमेवर असलेल्या आसाम रायफल्सच्या युनीटमध्ये प्रवेश मिळवला आहे. दीपा बनसोडे असे या मुलीचे नाव आहे.

नांदेड : घरची परिस्थिती हालाकीची असतानाही मुखेड येथील एका लाकूड व्यापाऱ्याच्या मुलीने गगनभरारी घेतली आहे. या मुलीने चीन सीमेवर असलेल्या आसाम रायफल्सच्या युनीटमध्ये प्रवेश मिळवला आहे. दीपा बनसोडे असे या मुलीचे नाव असून, या यशबद्दल दीपा बनसोडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. घरची परिस्थिती जेमतेम असतानाही जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.