'राज ठाकरे सोबत आले तर...', भाजपने मनसेसमोर ठेवलेल्या युतीचा प्रस्तावावर दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य

‘राज ठाकरे सोबत आले तर…’, भाजपने मनसेसमोर ठेवलेल्या युतीचा प्रस्तावावर दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Aug 14, 2023 | 6:41 PM

VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना युतीची ऑफर?, राज ठाकरे ही ऑफर स्वीकारणार की नाही? यावर राज ठाकरे यांची ठाम भूमिका समोर आली नसताना मंत्री दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ | भाजपने आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण भाजपसोबत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्याने भाजपच्या ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नाही, असं मोठं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी भाजपची ऑफर पूर्णपणे फेटाळल्याचं म्हटलेलं नाही. यावर दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, नवीन बदल होतात तेव्हा अडथळे निर्माण होतात, पण हे अडथळे कायमस्वरूपी नसतात. राज ठाकरे यांचं प्रेम मुंबईवर आहे. त्यामुळे मुंबईचं हित होतंय, मुंबईचा विकास ज्यावेळी होतोय त्यावेळी राज ठाकरे आमच्या सोबत असतील, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तर भाजपसह युती त्यांनी करावी की नाही, हा निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा आहे, पण धडाडीचा नेता ज्याच्या भाषणावर लाखो लोक ऐकायला जमतात ही त्यांची ताकद आहे. याच ताकदीचा वापर मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी झाला पाहिजे असेही दीपक केसरकर यांनी म्हटले. एकाच विचारधारेचे लोक एकत्र आले तर चांगलंच असल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी जर चांगला निर्णय घेतला तर या निर्णयाचा स्वागतच करू, असेही शेवटी दीपक केसरकर म्हणाले.

Published on: Aug 14, 2023 06:41 PM