India Alliance ची रॅली म्हणजे मुंबईकरांना टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर थेट म्हणाले…
VIDEO | महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज इंडिया आघाडीकडून पदयात्रा काढण्यात आली आहे. ‘मैं भी गांधी’ असं नाव या पदयात्रेला देण्यात आलंय, यावर शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर बघा व्हिडीओ
मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज इंडिया आघाडीकडून पदयात्रा काढण्यात आली आहे. ‘मैं भी गांधी’ असं नाव या पदयात्रेला देण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईतील काँग्रेस कार्यालयाच्या इंडिया आघाडीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यादरम्यान, इतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. इंडिया आघाडीच्या या पदयात्रेसाठी वर्षा गायकवाड, सचिन अहिर आणि इतर नेते हजर होते. इंडिया आघाडीच्या या पदयात्रेवर शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. ‘इंडिया आघाडी हा बुरखा आहे. ती जुनीच युपीआय आहे. इंडिया आघाडीची रॅली निघते, त्याला काही अर्थ नाहीये. यापूर्वी अण्णा हजारेंनी देखील अशी रॅली काढली होते त्यावेळी त्यांच्या यात्रेत मैं भी गांधी असं टोपीवर लिहिलं होतं. पण नंतर काय झालं हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे नाव घ्यायचं. गांधीजीच्या नावाचा वापर करायचा आणि अशा रॅली काढायच्या त्याकाही अर्थ नाही.इंडिया आघाडी मुंबईकरांना टोपी लावतायत की नाही हे आम्ही सांगू शकणार नाही, पण तरी देखील जे काही घडतंय ते योग्य नाही’, असे केसरकर म्हणाले.