माफी नाहीच... दिलगिरीऐवजी दीपक केसरकरांकडून पुन्हा सारवासारव; म्हणाले, माझ्या वक्तव्याचा विपर्यास पण....

माफी नाहीच… दिलगिरीऐवजी दीपक केसरकरांकडून पुन्हा सारवासारव; म्हणाले, माझ्या वक्तव्याचा विपर्यास पण….

| Updated on: Aug 29, 2024 | 11:10 AM

मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याची महाराजांचा पुतळा कोसळल्यानं रोष असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री दीपक केसरकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. वाईटातून काही चांगलं घडायचं असेल, असं केसरकर म्हणालेत. या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी त्यांनी पुन्हा एकदा सारवासारव केली आहे.

नवीन भव्य पुतळा उभा रहावा, हिच नियतीच इच्छा असावी. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या इच्छेशिवाय काही होत नाही, असं वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आणि ते चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले. अशा वादग्रस्त वक्तव्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी दीपक केसरकरांकडून पुन्हा सारवासारव केल्याचे पाहायला मिळाले. तर आपल्या वक्तव्याचा विपर्यास झालाचा दावाही त्यांनी केला आहे. यानंतर विरोधक मात्र केसरकरांवर चांगलेच आक्रमक झालेत. ‘मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असा दावा करताना दीपक केसरकर म्हणाले, सिंधुदुर्गवासियांची शिवरायांचा भव्य पुतळा व्हावा, अशीच इच्छा आहे. त्यामुळे या दुर्घटनेतून भव्य पुतळा उभा राहिल यालाच आपण वाईटातून चांगलं घडल्याचे म्हणालो’. मात्र उद्या समजा एखादा छोटासा पूल पडून दुर्घटना घडली आणि त्यावर आपण मोठा पूल उभारू असं म्हणून वाईटातून चांगलं घडेल, असं उत्तर किती समर्पक ठरेल, यावर केसरकर काहीच बोलले नाही.

Published on: Aug 29, 2024 11:10 AM