उद्धव ठाकरे यांनी एखादा मतदारसंघ शोधून खासदारकी लढवावी, शिंदे गटाचा खोचक सल्ला

“उद्धव ठाकरे यांनी एखादा मतदारसंघ शोधून खासदारकी लढवावी”, शिंदे गटाचा खोचक सल्ला

| Updated on: Jul 30, 2023 | 7:49 AM

ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.या मेळाव्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. या मेळाव्यावरून दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर टीका केली आहे.

औरंगाबाद, 30 जुलै, 2023 | ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.या मेळाव्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. या मेळाव्यावरून शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व्हायचं आहे तर त्यांनी त्यावर लक्ष द्यावे. एखादा मतदारसंघ निवडून खासदारकीची निवडणूक लढवावी. आम्हाला निवडणुका लढवण्याचं सांगण्यापेक्षा त्यांच्याकडे जे आमदार उरले आहेत, त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे मग कळेल.”

 

Published on: Jul 30, 2023 07:49 AM