दीपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं; म्हणाल्या, ‘… तर एकाचे दोन आमदार होतील’
मुंबई, २१ ऑगस्ट २०२३ | सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरे सुरू असून मुंबई गोवा, मुंबई नाशिक आणि कोकणातील काही रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर आता मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेकडून रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत जागरूकता व्हावी म्हणून मनसेकडून जागर यात्रा काढली जाणार आहे. या जागर यात्रेवरून शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री […]
मुंबई, २१ ऑगस्ट २०२३ | सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरे सुरू असून मुंबई गोवा, मुंबई नाशिक आणि कोकणातील काही रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर आता मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेकडून रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत जागरूकता व्हावी म्हणून मनसेकडून जागर यात्रा काढली जाणार आहे. या जागर यात्रेवरून शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मनसेला ट्विट करून डिवचलं आहे. ‘मनचेच्या जागर यात्राने भविष्यात शॅडो मंत्रीपद वाढेल पन यात्रेतरस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम घेतलीतर एकाचे दोन आमदार होतीलआणि युवा नेते शॅडो मंत्री बनतील,यात्रेत राष्ट्राच्या संपतीचे नुकसान नको’, असे म्हणत दीपाली सय्यद यांनी मनसेवर टीका केली आहे. तर पुढे दीपाली सय्यद असेही म्हणाल्या की, मनसे नेते संदीप देशपांडेना अजुनही डॅाक्टरची गरज आहे, ते लवकरच बरे होतील, कोणी व्हिल चेअर मागवा रे!