सावित्रीबाई फुले यांची बदनामी प्रकरण : इंडिक टेल्स वेबसाईट बंद, बदनामी करणारा सापडेना
VIDEO | 'भारद्वाज स्पीक'ला अटक कधी? इंडिक टेल्स वेबसाईट बंद पण सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणारा हाती लागेना..., बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, 28 जुलै 2023 | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणाऱ्या लेखाचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन महिने होऊन गेले तरीही लेख लिहणाऱ्या मोकाट का आहे? असा प्रश्न विरोधकांनी केला. यावेळी सभागृहात एकच गदारोळ झाला. इंडिक टेल्स वेबसाईटवर सावित्रीबाईंबद्दल एक लेख प्रसिद्ध झाला. ‘भारद्वाज स्पीक’ या नावाच्या ट्विटर हँडलवर हा लेख लिहून तो व्हायरल करण्यात आला, असा आरोप आहे. संपूर्णपणे खोटं आणि विकृतपूर्ण या लेखात सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण चळवळीवरच प्रश्न निर्माण करून बदनामी करण्यात आली. गेल्या १५ दिवसांपूर्वी सत्तेत गेलेल्या छगन भुजबळ यांनी विरोधात असताना या लेखाविरोधात रान उठवलं होतं. तर कारवाई नाही झाली तर आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर तो लेख हटवला गेला. मात्र ‘भारद्वाज स्पीक’ नावाचा व्यक्ती नेमका कोण आहे? इंडिक टेल्स वेबसाईट बंद पण सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणारा काही सापडेना….