मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! अखेर आजपासून डिलाईल रोड ब्रिज नागरिकांसाठी खुला
VIDEO | अखेर आजपासून डिलाईल रोड ब्रिज नागरिकांसाठी खुला, रविवारी मनसे आणि ऊबाठा गटाने हा पूल सुरू व्हावा यासाठी आंदोलन केलं. यानंतर दिपक केसरकर यांनी याठिकाणी दाखल होत या पूलाचं केलं उद्घाटन
मुंबई, १८ सप्टेंबर २०२३ | गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला डिलाईल रोड ब्रिज आजपासून अखेर नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. रविवारी मनसे आणि शिवसेना ऊबाठा गटाने हा पूल सुरू व्हावा यासाठी आंदोलन केलं. यानंतर दिपक केसरकर यांनी याठिकाणी दाखल होत या पूलाचं उद्घाटन केलं. अनेक अडचणींचा सामना करत हा ब्रिज खुला झाला आहे. पाचवेळा या पुलाच्या उद्घाटनाची तारीख देण्यात आली होती, मात्र अखेर आज त्याला मुहूर्त मिळाला आहे. हा पूल धोकादायक झाल्याच्या कारणास्तव देखभालीसाठी २४ जुलै २०१८ पासून वाहन आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला होता. पुलाचं काम मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वे करत होती. यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये रेल्वे हद्दीवरील पुलाचा भाग तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली.
या पुलावर पहिला गर्डर बसवण्याचे काम जून २०२२ मध्ये पूर्ण करण्यात आले. तर दुसरा गर्डर २४ सप्टेंबर २०२२ ला बसवण्यात आले. दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडीनंतर तब्बल पाच वर्षानंतर हा ब्रिज सुरू करण्यात आलाय. यामुळे लालबाग-परळकरांची वाहतुक कोंडीची चिंता मिटणार आहे.