जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारच्या बैठकीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…
VIDEO | मनोज जरांगे यांच्या वतीने ११ जणाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी उपस्थित, बैठकीत काय झाली चर्चा? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुंबई, ९ सप्टेंबर २०२३ | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची आणि राज्य सरकारची काल रात्री सह्याद्रीवर बैठक झाली. साधारण अडीच तास ही बैठक चालली. या बैठकीमध्ये मनोज जरांगे यांच्या वतीने ११ जणांचं शिष्टमंडळ या बैठकीत हजर होतं. या बैठकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी ते अभ्यासपूर्ण असणं गरजेचं आहे. मराठा आरक्षणाचा तंतोतंत जीआर काढण्यासाठी काही अवधी मिळाला पाहिजे. फडणवीस पुढे असेही म्हणाले, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिले. तर आंदोलकांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलिसांची चैकशी करण्यात येईल आणि आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाहीही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा १२ वा दिवस आहे. तर शिष्टमंडळ जालन्यात आल्यावर चर्चा करून निर्णय घेईन, असं जरांगे यांनी म्हटले आहे. आज जरांगे आपलं उपोषण मागे घेणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.