अब दिल्ली दूर नही ! दिल्ली ते मुंबईचा प्रवास अवघ्या १२ तासात, कधी होणार लोकार्पण?
VIDEO | ड्रोनच्या नजरेतून बघा दिल्ली-मुंबईला जोडणाऱ्या एक्सप्रेस वेचे विहंगम दृश्य
मुंबई : दिल्ली – मुंबईला जोडणारा एक्सप्रेस वे तयार झाला असून आता मुंबईवरून दिल्लीला जाणं काही दूर नाही. कारण अवघ्या १२ तासात दिल्ली – मुंबई एक्सप्रेस वेवरून प्रवास करता येणार आहे. दिल्ली – मुंबई एक्सप्रेस वे साकारण्यात नितीन गडकरीना शिल्पकार मानलं जात आहे. तर १२ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. दिल्ली मुंबई वे हरियाणातील राजीव चौक, गुरूग्राम येथून सुरू होईल, आणि मेवात, जयपूर कोटो, भोपाळ अहमदाबाद मार्गे मुंबईला जाणार आहे. दिल्ली ते मुंबई जाण्यासाठी २० तासाऐवजी केवळ १२ तास लागणार असून द्रुतगती मार्गावरून लोकांना त्यांच्या खासगी वाहनांनी सहज जाता येणार आहे. याच दिल्ली – मुंबई एक्सप्रेसची ड्रोन टीपलेली विहंगम दृश्य नक्की बघा…
Published on: Feb 11, 2023 09:07 AM
Latest Videos