Delhi Rain Update | दिल्लीत मुसळधार पाऊस, ठिकठिकाणी पाणी साचलं
देशाची राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नवी दिल्लीत पाणी तुंबल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आजही नवी दिल्लीत सुरु असलेल्या पावसानं पाणी तुंबल्याचं समोर आलं आहे.
नवी दिल्ली: देशाची राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नवी दिल्लीत पाणी तुंबल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आजही नवी दिल्लीत सुरु असलेल्या पावसानं पाणी तुंबल्याचं समोर आलं आहे. राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवासंपासून सातत्यानं जोरदार पाऊस पडतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या निवासस्थानी पाणी शिरल्याचं समोर आलं होतं. आज संततधार पावसामुळं दिल्लीच्या विविध भागाता पाणी तुंबल्याचं समोर आलं आहे. प्रामुख्यानं मोती बाग आणि आर के पुरम या भागात पावसाचं पाणी तुंबल्याची छायाचित्र एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रकाशित केली आहेत.
Latest Videos