दिल्ली महापालिका जिंकण्यासाठीच भाजपकडून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण, संजय राऊतांचा आरोप

| Updated on: Apr 19, 2022 | 12:29 PM

देशातील दोन प्रमुख शहरांसह अनेक शहरात दंगलीचं वातावरण तयार केलं गेलं आहे. सत्ताधारी पक्षाकडून हे वातावरण केलं गेलं आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. देशाच्या राजधानीत दंगल होत आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. तिथे पालिकेचे निवडणूक येत आहे. आधी निवडणुका पुढे ढकल्या. आता दंगली घडवल्या. असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई: देशातील दोन प्रमुख शहरांसह अनेक शहरात दंगलीचं वातावरण तयार केलं गेलं आहे. सत्ताधारी पक्षाकडून हे वातावरण केलं गेलं आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. देशाच्या राजधानीत दंगल होत आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. तिथे पालिकेचे निवडणूक येत आहे. आधी निवडणुका पुढे ढकल्या. आता दंगली घडवल्या. पालिका निवडणुका जिंकण्यासाठीच हे सुरू आहे. त्यांच्याकडे काहीच मुद्दे नाही. त्यामुळेच हा प्रकार सुरू आहे, असं शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. मुंबईत (mumbai) हाच तणाव सुरू केला आहे. कुणाला तरी पकडून हे काम केलं आहे. देशातील शहरात असे तणाव निर्माण कराल तर देशाची अर्थव्यवस्था डबघाईला गेली. ती अजून ढासळेल. लोक आता कोव्हिडमधून बाहेर पडले आहेत. त्यात तुम्ही असं करत असाल तर देशाची अर्थव्यवस्था श्रीलंका आणि युक्रेनपेक्षाही डबघाईला जाईल, असं संजय राऊत म्हणाले.

Published on: Apr 19, 2022 12:29 PM