2 हजारांच्या नोटा बाद अन् नोट प्रेसच्या कर्मचाऱ्यांवर भार; कारण…
VIDEO | येत्या 3 महिन्यात 500 रुपयांच्या 'इतक्या' नोटा छापून देण्याचे नाशिकच्या करन्सी नोटप्रेसला केंद्राने दिले निर्देश
नाशिक : भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. 2 हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 500 रुपयांच्या नोटांची मागणी वाढणार आहे परिणामी त्यांची छपाई देखील वाढवली जाणार आहे. केंद्र सरकारने नाशिकच्या करन्सी प्रेसला 500 रुपयांच्या नोटा छापण्याचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले आहे. तर येत्या 3 महिन्यात 500 रुपयांच्या 165 कोटी नोटा छापून देण्याचे नाशिकच्या करन्सी नोटप्रेसला उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर एप्रिलपासून आतापर्यंत 30 कोटी 500 रुपयांच्या नोटा छपाई झाल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने दिलेल्या या निर्देशानंतर नोट प्रेसमधील कर्मचाऱ्यांवर कामाचा भार येणार असल्याचे सहाजिक आहे. खरंतर 2 हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सामान्य नागरिकांना त्यांच्याकडील असणाऱ्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी गर्दी करायला सुरूवात केली आहे.