‘मी राजीनामा का द्यायचा?’, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून टीका होत असताना धनंजय मुंडे स्पष्टच म्हणाले…
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून थेट आरोप वाल्मिक कराड याच्यावर होतोय आणि हाच वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा खास माणूस आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा अशी मागणी होतेय.
वाल्मिक कराडवरून बीडच्या सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे. मात्र मी आरोपी नाही किंवा माझा याच्याशी काही संबंध नाही, असं म्हणत मी राजीनामा का द्यायचा? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. तर दुसरीकडे खासदार बजरंग सोनावणे यांनीदेखील मोठा आरोप केलाय. अजित पवार यांच्या ताफ्यातील कार वाल्मिक कराडने सरेंडरसाठी वापरली असल्याचे बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून थेट आरोप वाल्मिक कराड याच्यावर होतोय आणि हाच वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा खास माणूस आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा अशी मागणी होतेय. दरम्यान, सीआयडी, एसआयडी आणि न्यायालय असा तिहेरी तपास सुरू असल्याने माझा मंत्री म्हणून दबाव असूच शकत नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान, धनंजय मुंडेंनी राजीनाम्यावरून आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर विरोधकांनी अजित पवार यांच्या मौनावरही बोट ठेवलंय. अजून धनंजय मुंडेंवर अजित पवार शांत का? धनंजय मुंडेंची विकेट घेऊन छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देणार आहेत का? असं विजय वडेट्टीवार म्हणाले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट