McDonald’s चा पिझ्झा, बर्गर खाताय…मग हा व्हिडीओ बघाच… ग्राहकांना बनवलं जातंय उल्लू
मॅकडोनॉल्डमध्ये ग्राहकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मॅकडोनॉल्डमध्ये चीजच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे. मॅकडोनॉल्डच्या पदार्थांमध्ये चीन न वापरता चीजसदृश्य पदार्थांचा वापर केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघड
अहमदनगर, २२ फेब्रुवारी २०२४ : मॅकडोनॉल्डमध्ये ग्राहकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मॅकडोनॉल्डमध्ये चीजच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे. मॅकडोनॉल्डच्या पदार्थांमध्ये चीन न वापरता चीजसदृश्य पदार्थांचा वापर केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघड झालाय. यानंतर कारवाईची मागणी होत असताना मॅकडोनॉल्डकडून चीज शब्द काढून टाकत पदार्थांची नवी नावं जाहीर करण्यात आली आहे. अन्न व सुरक्षा विभागाने कारवाईचे आदेश दिल्यानंतर हे पाऊल मॅकडोनॉल्डकडून उचलण्यात आलंय. अहमदनगर येथील मॅकडोनॉल्ड रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार उघड झाला होता. विविध पदार्थांमध्ये चीजसदृश्य पदार्थ वापरल्या जात असल्याचे समोर आले होते. अन्न आणि सुरक्षा आयुक्तांनी प्रकरणात रेस्टॉरंटला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
Published on: Feb 22, 2024 02:14 PM
Latest Videos