काँग्रेस आमदाराच्या नावानं मागितली लाच अन्…, कुठं घडला धक्कादायक प्रकार
VIDEO | काँग्रेस आमदाच्या नावाने तब्बल 1 कोटी रुपयांची लाच मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस, एसीबी अधिकाऱ्यांनी आरोपीला पकडलं रंगेहात
नागपूर : नागपूरमधून सर्वात धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेस आमदाच्या नावाने तब्बल 1 कोटी रुपयांची लाच मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एसीबी अधिकाऱ्यांनी आरोपीला रंगेहात पकडलं आहे. तर या प्रकरणी दिलीप खोडे नावाच्या व्यक्तीला 25 लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. आरोपी दिलीप खोडे हा टेक्नीशियन पदावर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरात एसीबीने ही मोठी कारवाई केली आहे. नागपुरात एका महिला अधिकाऱ्याने आपल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून विनयभंग करण्यात आल्याची तक्रार केली होती. या महिला अधिकाऱ्याने काँग्रेस आमदार वजाहत मिर्झा यांच्याकडेही तक्रार केलेली. पीडित महिलेने संबंधित प्रकरणी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करावे आणि कारवाई करण्याची मागणी करावी, अशी विनंती केली होती. मात्र त्यानंतर धक्कादायक प्रकार बघायला मिळाला.